या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे...

 
श्री. माणिकराव ठाकरे यांची संघर्ष प्रवण वृत्ती, जिद्द, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रेरक परिचय देणाऱ्या या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !
 
 

व्यक्तिमत्व

प्रचंड आत्मविश्वास, श्रद्धावान व्यक्तित्व व सामाजिक जाणीव लाभलेले माणिकराव एक कुशल व आदर्श नेते आहेत. संघ बांधणीची विशेष कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळी झळाळी प्रदान करते.

कुशल नेतृत्व

समाजाच्या सूक्ष्मतम बाबींचा सखोल अभ्यास असलेल्या माणिकरावांनी राजकारणाच्या दृष्टिकोणातून, तळागाळातील सामाजिक स्तरावर, सातत्याने कार्य केले आहे. विदर्भातील शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना ग्रामीण भागाबद्दल जाणीव तर आहेच त्याच बरोबर त्यांच्या एक विशेष व्यापक व जागतिक दृष्टीकोण आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास करून संस्कृती व सभ्यतेच्या कालसापेक्ष विकासाची विशेष जाण ठेऊन ते कार्यरत आहेत.

उपसभापती

एक अत्यंत जबाबदार व न्यायी नेता म्हणून नावलौकिक मिळवून ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदावर कार्य करीत आहेत. विकासाची दृढ इच्छा बाळगून माणिकरावांनी एक सक्षम संघ निर्माण केला आहे.  जनतेच्या कल्याणासाठी राजकारण हे कर्तव्य मानून पदाचा सदुपयोग करण्यासाठी कायम तत्पर असे व्यक्तिमत्त्व!

अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती

एक प्रभावी वक्ता म्हणून आपली ओळख निर्माण करून आपल्या वक्तव्यातून त्यांनी आपल्या पक्षाची कार्य प्रणाली, पक्षाचे तत्व व ध्येय-धोरण या बद्दल नेहमीच श्रद्धा व विश्वास  निर्माण  केला आहे.  कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा आणि आपुलकी निर्माण करणे हे वैशिष्ठ्य.

राज्य मंत्री

मंत्री पदावर कार्यरत राहून त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकार्त्यामध्ये व अधिकारी वर्गात आपल्या विधायक धोरणामुळे एक आगळा वेगळा विश्वास निर्माण केला आहे. जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मंत्रीपदाचा आदर्श कसा निर्माण केला जाऊ शकतो याचे उदाहरण आपल्या कार्यकाळात सिद्ध केला.

 

 फेसबुक

ट्विटर

इंस्टाग्राम

Youtube

     

    “काँग्रेस काय आहे ? काँग्रेस हि काही निवडक लोकांची संस्था नाही तर सर्वसामान्य जनतेची सुसंघटीत शक्ती आहे. जनतेशी निगडीत आणि जनतेच्या मालकीचे संघटन आहे..”

     
     

    आमच्या सोबत यायचे आहे ? संपर्क करा…